आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 एप्रिल 2021

daily horoscope 02 april 2021 today rashibhavishya
daily horoscope 02 april 2021 today rashibhavishya

आजचे पंचांग - शुक्रवार : फाल्गुन कृष्ण ५/६, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, सूर्योदय ६. २९ सूर्यास्त ६. ४७, चंद्रोदय रात्री ११.४७, चंद्रास्त सकाळी १०.०८, गुडफ्रायडे, रंगपंचमी, संत एकनाथ महाराज षष्ठी, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४३.
दिनविशेष -
१९३३ - विख्यात भारतीय क्रिकेटपटू रणजितसिंह यांचे निधन. १९३४ पासून त्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा घेतल्या जातात.
१९९८ - कोकण लोहमार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन - तिरुअनंतपुरम या राजधानी एस्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून झाला.
१९९९ - क्‍लोन तंत्राद्वारे तयार केलेल्या ‘डॉली’ या मेंढीने तिळ्यांना जन्म दिला.
२००० - दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तीला शासकीय सेवेत, तसेच निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंध करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.
वृषभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. वरिष्ठांची कृपा लाभेल.
मिथुन : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कन्या : प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृश्‍चिक : कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
धनु : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य मिळेल.
कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय प्रतिष्ठा लाभेल.
मीन : एखादी गुप्त वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com