आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 एप्रिल 2021

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 April 2021

वाचा आज काय आहे तुमच्या राशिभविष्यात

पंचांग
७ एप्रिल २०२१
बुधवार : फाल्गुन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय पहाटे ४.१०, चंद्रास्त दुपारी २.५८, पापमोचन एकादशी, भारतीय सौर चैत्र १७ शके १९४३.

दिनविशेष
१८५७ - भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाचे अग्रणी मंगल पांडे यांना फाशी देण्यात आले.
१९२२ - अष्टपैलू व चतुरस्र प्रतिभाशक्तीचे गायक गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे निधन. त्यांनी बालगंधर्व व मा. कृष्णराव यांच्यासारखे शिष्य घडविले. ‘भारत गायन समाज’ ही संस्था  स्थापन केली आहे.
१९२८ - नामवंत मराठी साहित्यिक, ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचा जन्म.
१९९९ - इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस) या भारतातील वृत्तपत्रांच्या शिखर  संघटनेच्या स्थापनेची साठ वर्षे पूर्ण.
२००० - समाजाभिमुख शिक्षक आणि स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षणप्रसारक मंडळीचे चिटणीस डॉ. ह. श्री. साने यांचे निधन.

वाचा - साप्ताहिक राशिभविष्य (४ ते १० एप्रिल २०२१)

राशिभविष्य
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. 
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : नवी दिशा, नवा मार्ग दिसेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणावरही अवलंबून राहू नका.
तुळ : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक  : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
कुंभ : व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मीन : नातेवाईकांसाठी जादा खर्च करावा लागेल. वाहने जपून चालवावीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily horoscope 8 april 2021 today rahisbhavishya