esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ६.५४, चंद्रास्त सकाळी ७, भारतीय सौर १० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
अहिंसादिन 

१८६९ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म. त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी.  दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील गौरेतर जमातीवर, विशेषतः हिंदी लोकांवर व तेथील मजुरांवर होणाऱ्या जुलमाविरुद्ध सत्याग्रहाचा किंवा निःशस्त्र प्रतिकाराचा प्रयोग गांधीजींनी केला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंगाची घोषणा केली. देशभर मिठाचा कायदा मोडणारे सत्याग्रह आंदोलन उभे राहिले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली. 
१८९१ : विख्यात शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म. त्यांना ‘पद्मश्री’ हा सन्मान प्रदान करण्यात आला होता.
१९०४ : भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म. १९२५ मध्ये त्यांनी काशी विद्यापीठाची ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. ‘जय जवान जय किसान’  ही त्यांची घोषणा त्या वेळी स्फूर्ती देणारी ठरली.  त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
१९०६ : विख्यात चित्रकार राजा रवी वर्मा यांचे निधन. कॅनव्हासवर तैलरंगात चित्रे काढण्याच्या तंत्राचा त्यांनी भारतात प्रथम वापर केला. त्यांनी रविवर्मा लिथो प्रेस हा छापखाना सुरू केला.

दिनमान -
मेष :
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्यता आहे.
वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटीने कामे पूर्णत्वास न्याल. 
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नावलौकिक लाभेल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. 
तुळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. वादविवाद टाळावेत.
वृश्‍चिक : कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. 
धनु : शासकीय कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.
मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. 
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

Edited By - Prashant Patil