आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०३ जुलै

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

पंचांग -
शुक्रवार - आषाढ शु. १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय सायं. ५.३५, चंद्रास्त प. ४.०७, भारतीय सौर १२, शके १९४२.

पंचांग -
शुक्रवार - आषाढ शु. १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय सायं. ५.३५, चंद्रास्त प. ४.०७, भारतीय सौर १२, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८३८ - प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचा जन्म. त्यांचे संपूर्ण नाव नारायण महादेव परमानंद. 
१८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्‍यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१९०९ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ बॅ. वि .म. ऊर्फ भाऊसाहेब तारकुंडे यांचा जन्म. त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.
१९१२ - मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचा जन्म. मधुर व पल्लेदार आवाजाची जन्मजात देणगी त्यांना लाभली होती.
१९९८ - ‘ए मेरे वतन के लोगों....’ हे ऐतिहासिक गीत ज्यांच्या लेखणीतून उतरले ते कवी प्रदीप यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.  कवी प्रदीप यांचे मूळ नाव रामचंद्र नारायणजी द्विवेदी. 
२००० - ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे मुंबईच्या समुद्रात ऑयस्टर रॉकजवळ सागरी संग्रहालयात रूपांतराच्या प्रस्तावाला राज्य सरकार, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मच्छीमार प्रतिनिधींची मान्यता.
२००१ -  ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
२००२ - ‘इन्सॅट - ३ सी’ हा सर्वांत मोठा स्वदेशी उपग्रह देशाला अर्पण.

दिनमान -
मेष :
आपण कोणत्याही कामामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यावी.  
वृषभ : आरोग्य चांगले राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. 
मिथुन : नको त्या कारणांसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. 
कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. 
सिंह : संततिसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात गती येईल.
कन्या : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेले काम पूर्ण कराल.
तूळ : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला जाईल.
वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. निर्णय अचूक ठरतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
धनू : महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. काहींना इस्पितळांना भेट द्यावी लागेल. 
मकर : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींबरोबर सुसंवाद साधू शकाल. 
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मीन : मन आनंदी व आशावादी राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 03rd July 2020