आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 जून 2021

पंचांग - शनिवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ३.०९, चंद्रास्त दुपारी ३.०३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १५ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

शनिवार : वैशाख कृष्ण ११, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ३.०९, चंद्रास्त दुपारी ३.०३, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०७, भारतीय सौर ज्येष्ठ १५ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक पर्यावरण दिन

१९२९ : विष्णुपंत दामले, एस. फत्तेलाल, व्ही. शांताराम, के. धायबर यांनी ‘प्रभात’चित्रसंस्थेची स्थापना केली.

१९५२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील ‘डॉक्‍टर ऑफ लॉज’ ही सन्मान्य पदवी दिली.

१९७३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी यांचे निधन.

१९८५ : प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचे निधन.

१९९४ : प्रसिद्ध पत्रकार आणि विद्वान के. के. नायर यांचे निधन. ‘कृष्णचैतन्य’ या नावाने ते सर्वत्र परिचित होते.

१९९६ : भारतातील ‘एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन’ आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ प्रा. वॉलेस ब्रोकर यांची ‘ब्लू प्लॅनेट’ या पर्यावरणविषयक पुरस्कारासाठी निवड.

१९९९ : राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले यांचे निधन.

दिनमान -

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता.

वृषभ : मनोबल उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कर्क : गुरूकृपा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.

कन्या : तुमचा उत्साह व उमेद वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : जिद्द व चिकाटीवाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : इतरांवर प्रभाव राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com