esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - अधिक आश्विन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१७, चंद्रोदय रात्री ९.२०, चंद्रास्त सकाळी ९.५२, भारतीय सौर १४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - अधिक आश्विन कृष्ण ४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१७, चंद्रोदय रात्री ९.२०, चंद्रास्त सकाळी ९.५२, भारतीय सौर १४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९३ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर भारतीय पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांचा जन्म. खगोलभौतिकी या विषयात आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ होत.
१९१३ - कविवर्य वा. रा. कांत यांचा जन्म. त्यांची ‘सखी शेजारिणी, तू हसत रहा..’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’, ‘बगळ्यांची माळ फुले अजूनि अंबरात’, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ इ. भावगीते लोकप्रिय आहेत.  त्यांचे ‘वेलांटी’, ‘पहाटतारा’, ‘शततारका’, ‘रुद्रवीणा’, ‘दोनुली’, ‘मरणगंध’ इ. काव्यसंग्रह, ६ अनुवादित पुस्तके, ललितलेख, स्फुटलेख, समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले.
१९४९ - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
१९७० - पुणे शहरातील चित्रपट प्रदर्शन व्यवसायाचे आद्य जनक, ‘आर्यन’ सिनेमा या चित्रपटगृहाचे संस्थापक, बापूसाहेब पाठक यांचे निधन.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत.  अचानक धनलाभाची शक्यता आहे.  
वृषभ : कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. मन आनंदी राहील.  
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.  मनोरंजनाकडे कल वाढेल. खर्च वाढतील.
कर्क : आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला आहे. सामाजिक कार्यात सहभागाची संधी मिळेल. 
सिंह :  कामे मार्गी लागणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.  
कन्या : नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रगती होईल. 
तुळ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील.  चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे. 
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल.  मुलामुलींची चांगली प्रगती होणार आहे.
धनु : दानधर्माकडे कल वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत. खर्च वाढणार आहेत. 
मकर : तुमचे विचार व अंदाज अचूक ठरणार आहेत. कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. 
कुंभ : आवडत्या व्यक्तींसाठी खर्च कराल. मनोरंजनाकडे कल वाढेल. प्रवास सुखरुप होईल.
मीन :  विवाहेच्छुंचे विवाह जुळतील. नातेवाईक, मित्र यांचे सहकार्य लाभेल. प्रगती होईल.

Edited By - Prashant Patil