आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

पंचांग -
सोमवार - कार्तिक कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.५५ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त दुपारी १२.२७, कालभैरव जयंती, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष १६ शके १९४२.

पंचांग -
सोमवार - कार्तिक कृष्ण ७, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.५५ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री १२.१६, चंद्रास्त दुपारी १२.२७, कालभैरव जयंती, कालाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष १६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
निशाण दिन । International Civil Aviation Day
१९७६ : नामवंत शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत गोवर्धनदास पारीख यांचे निधन. १९५८ मध्ये मुंबई विद्यापीठाचे ते कुलमंत्री झाले. पुण्याचा आर्यभूषण हा छापखाना सहकारी क्षेत्रात आणून ते त्याचे पहिले अध्यक्ष झाले. मराठी विश्‍वकोशाशी त्यांचा प्रथमपासून निकटचा संबंध होता. 
१९७९ : सदाशिव विनायक तथा अण्णासाहेब बापट यांचे निधन. लोकमान्य टिळक यांचे लेखक, लोकमान्य टिळकांच्या आठवणी व आख्यायिका यांचे ३ खंडांत लेखन-संपादन, न. चिं. तथा तात्यासाहेब केळकर यांच्या आठवणींचे संपादन व ‘लो. टिळक सूक्तिसंग्रह’चे संपादन. 
१९९६ : फादर फ्रान्सिस दिब्रिटो, बाबा भांड व सुधीर थत्ते या साहित्यिकांना ‘भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार’ जाहीर.
१९९८ : बहात्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वसंत बापट यांची निवड.

दिनमान -
मेष :
मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.
वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमची मते इतरांना पटवून द्याल.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम लाभेल. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.
कर्क : कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. आर्थिक कामे यशस्वी होतील.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. मनोबल उत्तम राहील. नवीन हितसंबंध जुळतील
धनु : काहींना गुरूकृपा लाभेल.नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मकर : मानसिक अस्वस्थता राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.
मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 07th December 2020