esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय पहाटे ४.०१, चंद्रास्त दुपारी ३.३०, सूर्योदय : ६.०५, सूर्यास्त : ६.५७, वरुथिनी एकादशी, भारतीय सौर वैशाख १७ शके १९४३.

दिनविशेष -

१८६१ - जगविख्यात भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंतक रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म. ‘जन गण मन’ हे त्यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत प्रथम गायले गेले. भारत स्वतंत्र झाल्यावर या गीताचा ‘राष्ट्रगीत’ म्हणून अधिकृतपणे स्वीकार झाला. १३ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक दिल्याचे जाहीर झाले.

१८८० - विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय डॉ.पांडुरंग वामन काणे यांचा जन्म. त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.

१९०७ - मुंबईमध्ये विजेवरील पहिली ट्राम धावली. तोपर्यंत ट्रामला घोडे जोडत असत.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : काहींना आर्थिक लाभाचे योग संभवतात. अपेक्षित सहकार्य लाभेल.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे खर्च वाढेल.

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मकर : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामात सुयश लाभेल.

कुंभ : अनपेक्षितपणे जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे.

मीन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.