आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

पंचांग -
बुधवार : कार्तिक कृष्ण ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री २.११, चंद्रास्त दुपारी १.५०, भारतीय सौर मार्गशीर्ष १८ शके १९४२.

पंचांग -
बुधवार : कार्तिक कृष्ण ९, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री २.११, चंद्रास्त दुपारी १.५०, भारतीय सौर मार्गशीर्ष १८ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०० : डेव्हिस कप टेनिस स्पर्धांची सुरवात.
१९४६ : डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय घटना समितीचे अधिवेशन सुरू.
१९९३ : इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला शाखेतर्फे देण्यात येणारा पहिला ‘जानकीदेवी बजाज पुरस्कार’ प्रसिद्ध समाजसेविका व स्त्रियांना उद्योगप्रवण करणाऱ्या महिला कार्यकर्त्या अनुताई लिमये यांना जाहीर.
१९९५ : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
२००३ : भारतीय चित्रसृष्टीतील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सदाबहार अभिनेते देव आनंद यांना २००२ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध जुळतील.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
सिंह : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.उधारी, उसनवारी वसूल होईल.
धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
कुंभ : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मीन : आरोग्य उत्तम राहील. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 09th December 2020