esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय पहाटे ५.०७, चंद्रास्त सायंकाळी ५.०६, सूर्योदय : ६.०४, सूर्यास्त : ६.५७, प्रदोष, शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, भारतीय सौर वैशाख १९ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक थॅलेसेमिया दिन

१८६६ : थोर समाजसेवक, संसदपटू, काँग्रेसचे अध्यक्ष गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म.

१९१९ : प्रसिद्ध कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन.

१९५९ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. त्यांच्यामुळे बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचंड प्रमाणात प्रसार झाला.

१९९४ : दक्षिण आफ्रिकेतील ३४२ वर्षांची वर्णभेदाची राजवट संपून आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते डॉ. नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले.

१९९५ : पाच तपांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी आयुष्य व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन.

१९९८ : ज्येष्ठ पार्श्वगायक तलत मेहमूद यांचे निधन.

१९९८ : अटलांटा येथे झालेल्या ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रूपी उन्नीकृष्णनने रायफल प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

१९९९ : प्रसिद्ध उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन.

दिनमान -

मेष : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वृश्‍चिक : आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.