
पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ५.०९, चंद्रास्त दुपारी ३.३२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१३, प्रदोष, भारतीय सौर पौष २० शके १९४२.
पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष कृष्ण १२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय पहाटे ५.०९, चंद्रास्त दुपारी ३.३२, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१३, प्रदोष, भारतीय सौर पौष २० शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१८९६ - महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, पंजाबचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, लेखक व प्रभावी वक्ते नरहर विष्णू ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म.
१८९७ - भारतातील प्लेगच्या साथीला आळा घालण्यासाठी लस शोधून काढणारे शास्त्रज्ञ डॉ. हाफकिन यांनी चौपट तीव्रतेची लस स्वतःला टोचण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ही लस अतिशय परिणामकारक ठरली.
१९०० - महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार ऊर्फ दादासाहेब सांबाशिवपत यांचा जन्म.
१९०१ - प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म पनवेल येथे झाला.
१९९९ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.
२००४ - सत्त्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते औरंगाबाद येथे उद्घाटन.
दिनमान -
मेष : नको त्या ठिकाणी वेळ वाया जाईल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
वृषभ : वरिष्ठांची कृपा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील.
सिंह : काहींना गुरूकृपा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कन्या : नवीन परिचय होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
तुळ : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
वृश्चिक : रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. सौख्य लाभेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.
मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठेचे योग येतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : काहींना महत्त्वाची वार्ता समजेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
Edited By - Prashant Patil