आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 10 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.8, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय रा. 11.56, चंद्रास्त दु. 12.55, भारतीय सौर 18, शके 1942.

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.8, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.41, चंद्रोदय रा. 11.56, चंद्रास्त दु. 12.55, भारतीय सौर 18, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७२ - विख्यात क्रिकेटपटू रणजितसिंह यांचा जन्म. त्यांच्या स्मरणार्थ रणजी करंडक क्रिकेट सामने खेळले जातात.
१८८७ - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म. प्रदेशातील मागासवर्गीय जातिजमातींचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कुमाऊँ परिषदेची स्थापना केली. १९५७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
१९१२ - भारताचे पाचवे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा जत्ती ऊर्फ बी. डी. जत्ती यांचा जन्म. राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनाने जत्ती यांच्यावर राष्ट्रपतिपदाचीही जबाबदारी आली. 
१९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाना, अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.
१९९६ - पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स या संस्थेतील मद्दाली विवेकानंद यांची अहमदाबाद येथील नडियाद हरि ओम आश्रमातर्फे दिल्या जाणाऱ्या विक्रम साराभाई संशोधन पुरस्कारासाठी निवड.

दिनमान -
मेष  :
कुटुंबासाठी खर्च कराल. जुनी येणे वसूल होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : अडचणी कमी होतील. महत्त्वाची कामे पूर्णत्वास न्याल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मिथुन : कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
कर्क  : तुमची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रांचा सल्ला लाभदायक ठरेल.
सिंह : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 
कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील. 
तुळ : वाहने सावकाश चालवावीत. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. 
वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर  : अपेक्षित गाठीभेटी होतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कुंभ : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : आपली मते इतरांना पटवून द्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 10th September 2020