esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ११ जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ११ जानेवारी २०२१

पंचांग -
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ६.१२, चंद्रास्त दुपारी ४.२८, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१४, शिवरात्री, भारतीय सौर पौष २१ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ११ जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार : मार्गशीर्ष कृष्ण १३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय सकाळी ६.१२, चंद्रास्त दुपारी ४.२८, सूर्योदय ७.१०, सूर्यास्त ६.१४, शिवरात्री, भारतीय सौर पौष २१ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९८ : प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते (ययाती कादंबरी), लघुनिबंधकार व  समीक्षक विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगली येथे झाला.
१९५५ : वृत्तपत्रीय कागद तयार करणाऱ्या नेपानगर कागद गिरणीतील उत्पादन सुरू. तोपर्यंत भारतीय वृत्तपत्रे परदेशी कागदावर अवलंबून होती.
१९६६ : भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्‍कंद येथे निधन. त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
१९८२ : प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजमोहन बिर्ला यांचे निधन.
१९९७ : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भवतोश दत्त यांचे कलकत्ता येथे निधन.
१९९७ : ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. पी. कोटेश्वरम यांचे निधन.
१९९९ : कमाल जमीन धारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारने 
जारी केला.

दिनमान -
मेष :
काहींना गुरूकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील.प्रवास सुखकर होतील.
वृषभ : नवीन परिचय होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तमे राहील.
तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक : उधारी, उसनवारी वसूल होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. विरोधकांवर मात कराल.
मकर : दानधर्मासाठी खर्च होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.प्रवास सुखकर होतील.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Edited By - Prashant Patil

loading image