आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १२ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध १, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त सायंकाळी ७.११, सूर्योदय ७.०५, सूर्यास्त ६.३२, इष्टी, पारशी मेहेर मासारंभ, भारतीय सौर माघ २२ शके १९४२.

पंचांग -
शुक्रवार : माघ शुद्ध १, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त सायंकाळी ७.११, सूर्योदय ७.०५, सूर्यास्त ६.३२, इष्टी, पारशी मेहेर मासारंभ, भारतीय सौर माघ २२ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७४२ : मराठेशाहीतील नामवंत मुत्सद्दी नाना फडणवीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांचा जन्म.
१७९४ : पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे निधन.
१९९८ : आपल्या चिंतनशील काव्याने मराठी काव्यसृष्टीत मानाचे स्थान निर्माण केलेल्या ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन.
१९९९ : संगीत क्षेत्रात केलेल्या असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरांटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे ‘डिस्टिंग्विश्‍ड व्हिजिटर ॲवॉर्ड’ जाहीर. 
२००१ : चाळीस वर्षे नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे-इनामदार यांचे निधन.
२००३ : पर्यावरणपूरक फायबरच्या निर्मितीसाठी साखर कारखान्यांतील बगॅसपासून सेल्युलोज वेगळे करण्याचा प्रकल्प पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने हाती घेतला. त्यास यश आल्यास सेल्यूलोजसाठी कापूस, मऊ लाकूड आदी अन्य कच्च्या मालाची गरज भासणार नाही.

दिनमान -
मेष :
आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामध्ये काळजी घेणे.उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : आरोग्य चांगले राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : विरोधकांवर मात कराल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक  : मन आनंदी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनु : विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. उत्साह व उमेद वाढेल.
कुंभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील.
मीन : महत्त्वाचे निर्णय  शक्‍यतो पुढे ढकलावेत. नको त्या गोष्टींवर वेळ खर्च होईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 12th February 2021