esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - श्रावण कृ. 9, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय रा.12.44, चंद्रास्त दु.2.11, भारतीय सौर 21, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 13 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - श्रावण कृ. 9, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.03, चंद्रोदय रा.12.44, चंद्रास्त दु.2.11, भारतीय सौर 21, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७९५ - साध्वी अहिल्यादेवी होळकर यांचे निधन. देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.
१८९० - त्र्यंबक बापूजी ठोमरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म. जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनाला (१९०७) त्यांनी केलल्या वाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. 
१८९८ - अष्टपैलू साहित्यिक, विडंबनकार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार, वक्ते अशा अनेक अंगांनी प्रसिद्ध असलेले  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म.
१९०६ - साहित्यिक आणि दिग्दर्शक विश्वनाथ चिंतामण ऊर्फ विश्राम बेडेकर यांचा जन्म.  ‘एक झाड दोन पक्षी’ हे त्यांचे आत्मचरित्र.
१९२३ -  श्रीमद्‌भागवताचे प्रवचनकार पं. काशिनाथशास्त्री जोशी यांचा जन्म.
१९८० -  लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. ‘प्रथमपुरुषी एकवचनी’ हे त्यांचे आत्मचरित्र.
१९८८ - चित्रपट-दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते आणि फिल्म इन्स्टिट्यूटचे पहिले संचालक गजानन जागीरदार यांचे निधन. 
१९९१ - कन्नड साहित्यिक व आधुनिक भारतीय साहित्य क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रा. विनायक कृष्ण गोकाकांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
आध्यात्मिक प्रगती होईल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्या.
वृषभ : आजचा दिवस आनंदात जाईल. शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल वाढेल.
मिथुन : नातेवाइकांकडून आर्थिक लाभाची शक्‍यता आहे. उत्साह व उमेद वाढेल. 
कर्क  : शासकीय कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात अडचणी जाणवतील. 
सिंह : हाताखालील कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वादविवाद टाळावेत. 
कन्या : मानसिक सौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात अडचणी निर्माण होतील. 
तूळ : कला, संगीत, नाट्य क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. 
वृश्‍चिक : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. 
धनू : प्रतिष्ठा लाभेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. 
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. भागीदारी व्यवसयात यश लाभेल.
कुंभ : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
मीन : वडिलांकडून लाभ होतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अधिकारपद मिळेल.

Edited By - Prashant Patil