आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर 2021 | Horoscope Astrology | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 नोव्हेंबर 2021

पंचांग -

शनिवार : कार्तिक शुद्ध १०, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय दुपारी २.२६, चंद्रास्त रात्री २.२१, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, भारतीय सौर कार्तिक २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९९४ - स्वीडनमधील सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.

२०१० - चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गगन नारंग याने १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रा आणि संजीव राजपूतच्या साथीत सांघिक १७८३ गुण मिळवत रौप्यपदक पटकाविले व वैयक्तिक प्रकारातही नारंगने रौप्यपदकाची कमाई केली.

२०१५ - अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील सुमारे ३.२ अब्ज पौंड किमतीच्या व्यावसायिक करारावर भारत आणि ब्रिटनने स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रामधील गुंतवणुकीला चालना देण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले असून, स्वच्छ ऊर्जा परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी नवे शोध आणि संशोधनावर जोर देण्याच्या दृष्टीने भारत आणि ब्रिटनने करार केला.

२०१७ - इराक आणि इराणच्या सीमावर्ती भागाला बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यामुळे सुमारे ४०० जण मृत्युमुखी, तर चार हजार जण जखमी. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्‍टर स्केल होती.

दिनमान -

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कर्क : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

सिंह : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : साहित्यिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल आहे. गुरूकृपा लाभेल.

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. गुप्त वार्ता समजेल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

loading image
go to top