आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १४ फेब्रुवारी २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
रविवार : माघ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०४, सूर्यास्त ६.३३, चंद्रोदय सकाळी ८.५०, चंद्रास्त रात्री ८.५५, मु. रज्जब मासारंभ, भारतीय सौर माघ २४ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१६ - काव्यरचना आणि काव्यगायन या दोन्ही क्षेत्रांत मोठा लौकिक मिळविलेल्या कवयित्री संजीवनी मराठे यांचा जन्म.
१९२१ - ख्यातकीर्त व्हायोलिनवादक पंडित व्ही. जी. जोग यांचा जन्म. अर्धशतकाहून अधिक काळ रंगलेल्या आपल्या सांगीतिक कारकीर्दीत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले. त्यात ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ किताब, संगीत नाट्य अकादमी पुरस्कार, पश्‍चिम बंगाल सरकारचा राज्य नाटक पुरस्कार, कालिदास सन्मान व हाफीज अली खाँ पुरस्कार आदींचा समावेश आहे. 
१९७३ - संपूर्ण भारतीय बनावटीचे ‘मिग’ विमान तयार करण्यात यश.
१९७४ - नामवंत ख्याल गायक उस्ताद अमीर खाँ यांचे निधन. प्रसिद्ध अभिनेते शाहबाज खान हे त्यांचे चिरंजीव.
२००० - पुण्याचा बुद्धिबळपटू अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर किताबाचा मानकरी ठरला.
२००१ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक दुलाल गुहा यांचे निधन. 
२००३ - भारतीय विद्या भवन संस्थेचे संचालक जनरल सुंदरम रामकृष्णन यांचे निधन.
२००३ - प्रौढ प्राण्यापासून तयार करण्यात आलेला पहिला क्‍लोन ठरलेली ‘डॉली’ ही मेंढी मरण पावली, असे तिची निर्मिती करणाऱ्या रोझलिन इन्स्टिट्यूटने जाहीर केले.
२००५ - माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ‘वनराई’चे संस्थापक मोहन धारिया यांचे ८१ व्या वर्षात पदार्पण.

दिनमान -
मेष :
कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता.
वृषभ : काहींना दुपारनंतर अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक कामात उत्साह वाढेल.
कर्क : दुपारनंतरचा दिवस विशेष अनुकूल आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
सिंह : महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्‍चिक  : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मकर : अचानक धनलाभ संभवतो. नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : प्रवासाचे बेत टाळावेत. मानसिक अस्वस्थता राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com