आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 नोव्हेंबर 2021 | Horoscope | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 नोव्हेंबर 2021

पंचांग -

रविवार : कार्तिक शुद्ध ११, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दु. ३.०३, चंद्रास्त पहाटे ३.१२, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, प्रबोधिनी एकादशी, विष्णू प्रबोधोत्सव, पारशी तीर मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४३.

दिनविशेष -

२००८ : पृथ्वीपासून ३ लाख ८६ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर तिरंगा फडकाविण्याची अतुलनीय कामगिरी भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखविली. ‘मून इम्पॅक्‍ट प्रोब’ ही चांद्रयानाने सोडलेली तिरंगी कुपी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरली. अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला.

२०१० : आशियायी क्रीडा स्पर्धेत अव्वल बिलियर्डसपटू पंकज अडवानीने भारताचे सुवर्णपदकाचे खाते उघडले.

२०१० : नाशिक जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, देशात आणि परदेशांतील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या द्राक्षांना अधिकृतपणे बौद्धिक संपदेचा (पेटंट) दर्जा केंद्र सरकारच्या चेन्नई येथील भौगोलिक नोंदणी कार्यालयाकडून मिळाला.

२०१४ : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन २०१३-१४ या मोसमातील आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला. सर्वोत्तम कसोटीपटूही होण्याचा मान त्याला मिळाला.

२०११ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘दि वॉल’ या विशेषणाला जागत राहुल द्रविडने ३६ वे कसोटी शतक पूर्ण केले.

२०१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. उच्चशिक्षण घेताना डॉ. आंबेडकर यांनी या घरात वास्तव्य केले होते.

२०१५ : ३५ व्या अंटार्क्‍टिका संशोधन मोहिमेच्या प्रमुखपदी भारतीय हवामान शास्त्र विभागातील वैज्ञानिक विलास लक्ष्मण जोगदंड यांची निवड.

दिनमान -

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल.

कर्क : एखादी गुप्त वार्ता समजेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तूळ : संततिसौख्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे.

वृश्‍चिक : प्रवास सुखकर होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : व्यवसाय वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

मीन : वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे.

loading image
go to top