आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १५ फेब्रुवारी २०२१

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १५ फेब्रुवारी २०२१

१५ फेब्रुवारी २०२१
सोमवार : माघ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय सकाळी ९.२५, चंद्रास्त रात्री ९.४५, श्री गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, सूर्योदय- 7.02 , सूर्यास्त - 6.35, भारतीय सौर माघ २५ शके १९४२.


दिनविशेष
१८६९ : ख्यातनाम उर्दू कवी मिर्झा गालिब यांचे दिल्ली येथे निधन.  उर्दू गद्य-पद्याला वाङ्‌मयीन प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
१९३९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद. त्यातून कार्यकारिणीच्या बारा सभासदांचा राजीनामा. पंडित नेहरूंचाही राजीनामा.
१९५३ : किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक व हिराबाई बडोदेकर यांचे बंधू सुरेशबाबू माने यांचे निधन.
१९७८ : भारताचे सरन्यायाधीश म्हणून यशवंतराव चंद्रचूड यांची नियुक्ती. या पदावर सर्वांत प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले.
१९९३ : पुणे येथील चित्रकार मुरली लाहोटी यांना दिल्ली येथील राष्ट्रीय ललित कला अकादमीचा पुरस्कार जाहीर.
२००० : के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कारासाठी १९९९साठी प्रसिद्ध तमीळ नाटककार  डॉ. इंदिरा पार्थसारथी यांची निवड.

दिनमान
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी होतील.
मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्क : काहींना गुरुकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
सिंह : मनोबल कमी राहील. वादविवादात सहभाग टाळावा.जिद्द व चिकाटी वाढेल. 
कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
वृश्‍चिक  : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनू : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, कामे मार्गी लावू शकाल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
मीन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
प्रा. रमणलाल शहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com