esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग- रविवार : निज आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ६.१४, अन्नकुट, गोवर्धन पूजन, महालय समाप्ती, (अमावास्या समाप्ती १०.३७), भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-
रविवार : निज आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ६.१४, अन्नकुट, गोवर्धन पूजन, महालय समाप्ती, (अमावास्या समाप्ती १०.३७), भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४२.

आजचे दिनमान

मेष - भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ - खर्चाचे प्रमाण वाढेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
मिथुन - नवीन परिचय होतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कर्क - प्रवास सुखकर होतील. संततिसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
सिंह - तुमची मते इतरांना पटवून देवू शकाल. कुटुंबासाठी खर्च होईल.
कन्या - खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुळ - आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक - काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
धनु - मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर - सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील.
कुंभ - नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. प्रवास सुखकर होतील.
मीन - वादविवादात सहभाग नको. तुमच्या मते इतरांना पटवून द्याल.


दिनविशेष - 

1630 : जर्मन खगोलशास्त्रज्ञ जोहानेस केपलर यांचे निधन. ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबवर्तुळाकार असल्याचे दाखवून त्यासंबंधी नियम मांडले.
1885 : आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील एक आद्य भारतीय कार्यकर्त्या गिजुभाई बधेका यांचा जन्म. त्यांच्या कार्याने पश्‍चिम भारतात बालशिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळे त्यांना "बालमित्र' ही पदवी मिळाली.
1915 : लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांना फाशी.
1971 : प्रसिद्ध लेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. "कुंकू' हा गाजलेला चित्रपट त्यांच्या "न पटणारी गोष्ट' या कादंबरीवर आधारलेला होता.
1978 : अमेरिकन मानवशास्त्रज्ञ मार्गारेट मीड यांचे निधन. प्रथम त्यांनी पॅसिफिक महासागरातील ओशिऍनिया बेटावरील आदिवासी लोकांचा अभ्यास केला. विशेषतः मॅनस बेटावरील पेरी गावातील आदिवासींचा अश्‍वयुगापासून इलेक्‍ट्रॉनिक युगापर्यंत एकाच पिढीत झालेला प्रवास त्यांनी कसोशीने टिपला. 28 विद्यापीठांनी त्यांना सन्मान्य डी.लिट ही पदवी दिली.
1982 : महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे निधन. 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर "भारतरत्न पुरस्कार' देण्यात आला.
1996 : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि ख्यातनाम कृषी वैज्ञानिक डॉ. माधवराव सूर्याजी ऊर्फ नानासाहेब पवार यांचे निधन.
1996 : भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना "सासाकावा पर्यावरण पुरस्कार' जाहीर. पर्यावरणाचे रक्षण व नियोजन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
1997 : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या "आयएनएस दिल्ली' या युद्धनौकेचे जलावतरण.
1999 : हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने रेवदंडा येथील ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते "शिवसमर्थ पुरस्कार' प्रदान.
2000 : देशात अठ्ठाविसावे घटक राज्य म्हणून झारखंड अस्तित्वात आले. झारखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
2000 : भारतातील अस्पृश्‍यतेच्या विरोधात प्रभावी मोहीम राबविणारे मार्टिन मॅकवान यांना रॉबर्ट केनेडी मानवी हक्क पुरस्कार जाहीर.
2005 : कबड्डी , खो-खो या अस्सल देशी खेळांना आंतरराष्ट्रीय लौकिक मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचलेले क्रीडामहर्षी हरिभाऊ साने यांचे 99 व्या वर्षात पदार्पण.