आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 नोव्हेंबर 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 नोव्हेंबर 2021

पंचांग -

सोमवार : कार्तिक शुद्ध १२, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय दु. ३.३७, चंद्रास्त प. ४.०१, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, तुलसी विवाहारंभ, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्य समाप्ती, भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४३.

दिनविशेष -

१९९६ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना ‘सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण व नियोजन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते भारतीय बनावटीच्या ‘आयएनएस दिल्ली’ या युद्धनौकेचे जलावतरण.

१९९९ - ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना प्रा.शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ‘शिवसमर्थ पुरस्कार’ प्रदान.

२००० - देशात अठ्ठाविसावे घटक राज्य म्हणून झारखंड अस्तित्वात आले. त्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.

दिनमान -

मेष : वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. संततिसौख्य लाभेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनू : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर : हितशत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

loading image
go to top