आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 जून 2021

पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री ११.१८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, पुण्यकाल सूर्योदय ते दुपारी १२.३९, भारतीय सौर ज्येष्ठ २४ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री ११.१८, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, पुण्यकाल सूर्योदय ते दुपारी १२.३९, भारतीय सौर ज्येष्ठ २४ शके १९४३.

दिनविशेष -

१८९८ : शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक डॉ. ग. श्री. खैर यांचा जन्म.

१९०७ : ज्येष्ठ समाजवादी नेते, लेखक, विचारवंत नारायण गणेश ऊर्फ नानासाहेब गोरे यांचा जन्म.

१९२४ : ‘प्रभात’च्या सुवर्णकाळाचे साक्षीदार बापू वाटवे यांचा जन्म.

१९२९ : सौंदर्य आणि मधुर आवाजाच्या जोरावर रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायिका, अभिनेत्री सुरय्या यांचा जन्म. सुरय्या १९५० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री बनल्या.

१९९३ : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त.

दिनमान -

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामात यश लाभेल.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने जपून चालवावीत.

कन्या : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात चांगला स्थिती राहील.

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुुरूकृपा लाभेल.

धनु : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : वादविवाद टाळावेत. तुमचे निर्णय अचूक ठरतील. कामात यश लाभेल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : काहींना मानसन्मानाचे योग येतील. शासकीय कामात यश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com