आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 जून 2021

पंचांग - बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री १२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, अरण्यषष्ठी, विंध्यवासिनी पूजा, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

बुधवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सकाळी १०.५४, चंद्रास्त रात्री १२, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, अरण्यषष्ठी, विंध्यवासिनी पूजा, भारतीय सौर ज्येष्ठ २५ शके १९४३.

दिनविशेष -

१९१६ : तेलगू कादंबरीकार, समीक्षक शिवराज वेंकट सुब्बाराव यांचा जन्म.

१९४७ : नव्या कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबूराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्याला सुरवात केली.

१९९५ : सकाळ पेपर्सचे माजी अध्यक्ष व विख्यात सॉलिसिटर आणि ज्येष्ठ कायदेपंडित जसवंतलाल मटुभाई यांचे निधन.

१९९५ : भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या पार्श्वगायनाने अजरामर झालेल्या लता व आशा या मंगेशकर भगिनींच्या मातोश्री शुद्धमती उर्फ माई मंगेशकर यांचे निधन.

दिनमान -

मेष : संततिसौख्य लाभेल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील.

वृषभ : आपल्या मताविषयी आग्रही राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत राहाल. आपल्या मतांबद्दल आग्रही राहाल.

धनु : मानसिक अस्वस्थता कमी होईल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दिवस फारसा अनुकूल नाही.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com