आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 मे 2021

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, चंद्रोदय सकाळी ९.१९, चंद्रास्त रात्री ११.०१, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

रविवार : वैशाख शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.००, चंद्रोदय सकाळी ९.१९, चंद्रास्त रात्री ११.०१, भारतीय सौर वैशाख २६ शके १९४३.

दिनविशेष -

१९२६ - शास्त्रीय व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळविलेल्या गायिका माणिक वर्मा यांचा जन्म. ‘वंदेमातरम्’, ‘सीता स्वयंवर’, ‘मायाबाजार’, ‘गुळाचा गणपती’, ‘पुढचं पाऊल’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘वाजवी पावा गोविंद’, ‘त्या चित्तचोरट्याला’, ‘अमृताहुनी गोड’ आदी त्यांची अनेक गीते अतिशय लोकप्रिय आहेत.

१९७५ - सिक्कीमला बाविसावे राज्य म्हणून मान्यता.

१९९४ - ज्येष्ठ समीक्षक व लेखक माधव मनोहर यांचे निधन. ‘विष्णुदास भावे’ सुवर्णपदकाचा मान पटकावणारे ते एकमेव समीक्षक होते. ‘अन्नदाता’, ‘एक आणि दोन’, ‘एका रात्रीची गोष्ट’ या त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

२००२ - महाराष्ट्राचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू के. बालकृष्ण पिल्ले यांचे निधन. सुमारे चार वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी दहा वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

दिनमान -

मेष : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ : आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : व्यवसायात फार मोठे धाडस टाळावे. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

सिंह : नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : मनोबल उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता, प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

धनू : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : काहींची वैचारिक प्रगती होईल. आर्थिक सुयश लाभेल.

मीन : व्यवसायातील उलाढाल वाढवू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com