आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 जून 2021

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त रात्री १२.३९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भद्रा, भारतीय सौर ज्येष्ठ २६ शके १९४३.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त रात्री १२.३९, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.११, भद्रा, भारतीय सौर ज्येष्ठ २६ शके १९४३.

दिनविशेष -

१८९५ - महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, ‘केसरी’ व ‘सुधारक’ या वृत्तपत्रांचे संपादक, बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन.

१९९१ - नामवंत हिंदी साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचे निधन.

१९९१ - भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

१९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस यांचे निधन.

१९९७ - माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव आणि माजी केंद्रीय मंत्री हरिकृष्ण शास्त्री यांचे निधन.

२००० - पुण्यातील लाल महालाच्या आवारातील बाल शिवाजी व जिजामाता यांच्या शिल्पाचे शाहू महाराजांच्या हस्ते अनावरण.

दिनमान -

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : काहींना मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत जबाबदारी वाढेल.

सिंह : नवा मार्ग व नवी दिशा दिसेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

कन्या : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

तुळ : नवीन परिचय होतील. आर्थिक सुयश लाभेल.सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : राजकीय प्रतिष्ठा लाभेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.

धनु : तुमचे निर्णय योग्य ठरतील. गुरूकृपा लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

मकर : वाहने सावकाश चालवावीत. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कामे मार्गी लागतील.

मीन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com