esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ७.०१ सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी १०.२०, चंद्रास्त रात्री ९.४८, विनायक चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष २७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : मार्गशीर्ष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ७.०१ सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी १०.२०, चंद्रास्त रात्री ९.४८, विनायक चतुर्थी, भारतीय सौर मार्गशीर्ष २७ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
अल्पसंख्यांक हक्क दिन - भारत

१९२६ : आपल्या तडफदार गायनाने मराठी रंगभूमी गाजविलेले प्रसिद्ध गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचा जन्म. आचार्य अत्रे यांनी ‘महाराष्ट्र गंधर्व’ असा त्यांचा गौरव केला होता. 
१९५८ : संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी दिल्लीत मोर्चा. पोलिसांनी रोखल्याने पंधराशे सत्याग्रहींनी संसद भवनापुढे ठाण मांडले.
१९६५ :  माजी लष्करप्रमुख जनरल के.एस.थिमय्या यांचे निधन. सरकारने त्यांना ‘महावीरचक्र’ व ‘पद्मभूषण’ सन्मान प्रदान केले होते.
१९९१ : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘टीका स्वयंवर’ या समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
आजचा दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : प्रवासात दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
सिंह : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रुंवर मात कराल.
कन्या : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक : प्रवासाचे योग येतील. काहींना गुरूकृपा लाभेल.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. जुनी येणी वसूल होतील. 
मकर : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

Edited By - Prashant Patil

loading image