आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 नोव्हेंबर

Bhavishya_73.jpg
Bhavishya_73.jpg

पंचांग- 

गुरुवार : कार्तिक शुद्ध ५, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, सूर्योदय ६.४४, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी १०.४९, चंद्रास्त रात्री १०.०६, पांडव पंचमी, कड पंचमी, ज्ञानपंचमी (जैन), भारतीय सौर कार्तिक २८ शके १९४२.

आजचे दिनमान

मेष - नवीन परिचय होतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ - प्रवास शक्‍यतो टाळावेत. तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संधी लाभेल.
मिथुन - तुमची मते इतरांना पटवून द्याल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क - हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
सिंह - शैक्षणिक क्षेत्रात व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला. हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या - कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पार पडतील.
तुळ - मुलामुलींच्या संदर्भात एखादी समस्या निर्माण होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्‍चिक - जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
धनु - आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर - खर्चाचे प्रमाण वाढेल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
कुंभ - नवीन परिचय होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
मीन - शासकीय कामे मार्गी लागतील. प्रियजनांसाठी खर्च कराल.

दिनविशेष - 

1810 : अमेरिकी वनस्पतिशास्त्रज्ञ ऍसा ग्रे यांचा जन्म. वनस्पतींच्या जाती आणि वर्गीकरण या विषयीच्या संशोधनाबद्दल ते प्रसिद्ध होते.
1861 : जगातील सर्वप्रथम पेट्रोलियम निर्यातीसाठी "एलिझाबेथ' हे जहाज अमेरिकेहून ब्रिटनकडे रवाना.
1875 : प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे अभ्यासक पुरातत्त्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचा जन्म.
1877 : बंगाली भावकवी करुणानिधान बंदोपाध्याय यांचा जन्म. त्यांचे "वंगमंगल', "प्रसादी', "झरा-फूल', "शांतिजल' इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 1951 मध्ये कलकत्ता विद्यापीठाने त्यांना "जगत्तारिणी सुवर्णपदक' प्रदान केले.
1917 : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताचा विजय झाला व बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यांना "भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले.
1935 : भारत सेवक समाजाचे सदस्य, स्त्री शिक्षणाचे कृतिशील पुरस्कर्ते व सहकारी चळवळीचे आद्य समर्थक गोपाळ कृष्ण देवधर यांचे निधन.
1971 : मराठी लघुकथेचे प्रवर्तक व प्रसिद्ध विनोदी लेखक कॅ. गो. गं. लिमये यांचे निधन. मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणाऱ्या डासांवर अभ्यास करून त्यांनी "डास तो काय' अशा पुस्तिकांची मालिका लिहिली होती.
1999 : ज्येष्ठ कीर्तन व प्रवचनकार, ज्ञानेश्‍वरीचे अभ्यासक रामदास कृष्ण धोंगडे यांचे कोल्हापूर येथे निधन.
2000 : ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता व निःशस्त्रीकरण पुरस्कार राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते प्रदान.
2001 : तमिळनाडूत गुटखा, पानमसाला व चघळण्याच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली.
2002 : ज्येष्ठ कामगार नेते व लाल निशाण (लेनिनवादी) पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. ऊर्फ अप्पासाहेब भोसले यांचे निधन.
2003 : पुण्यातील आंतरविद्यापीठ खगोलविज्ञान आणि खगोल भौतिकी केंद्राच्या (आयुका) शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ. टी. पद्मनाभन यांना वैज्ञानिक संशोधनासाठी जी. डी. बिर्ला पुरस्कार जाहीर. डॉ. पद्मनाभन यांनी सैद्धांतिक भौतिकी आणि विश्‍वरचनाशास्त्राच्या विविध क्षेत्रांमध्ये व्यापक काम केले आहे. विश्‍वात आकाशगंगांसारख्या घटकांची निर्मिती समजून घेण्यातही त्यांचे काम मोठे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com