आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

पंचांग -
बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर पौष २९ शके १९४२.

पंचांग -
बुधवार : पौष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय दुपारी १२.०२, चंद्रास्त रात्री १२.४१, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, बुधाष्टमी, भारतीय सौर पौष २९ शके १९४२. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८७१ : भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापडगिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती सर रतनजी जमशेटजी टाटा यांचा जन्म.
१९४८ : महात्मा गांधींच्या हत्येचा पहिला प्रयत्न झाला. सायंप्रार्थना भाषणाच्या वेळी बाँबस्फोट.
१९७८ : प्रसिद्ध नाटककार व मराठी रंगभूमीचे अभ्यासक वि. ना. कोठीवाले यांचे निधन.
१९९८ : संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा पोलार संगीत पुरस्कार विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांना जाहीर.
१९९९ : साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांना जाहीर.
२००२ : रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग (रॉ) या भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आर. एन. काओ यांचे निधन. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.
२००३ : ‘इन्फोसिस टेक्‍नॉलॉजीज’ला २००३ ची सर्वांत आदरणीय कंपनी असा पुरस्कार उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते देण्यात आला.
२००३ : ‘द अवर्स’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा असणारा ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ मिळाला.

दिनमान -
मेष :
आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामात सुयश लाभेल.
वृषभ : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मिथुन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
कर्क : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. मान व प्रतिष्ठा लाभेल.
सिंह : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कन्या : दैनंदिने कामात अडचणी जाणवतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्‍चिक : मनोबल कमी राहील.वाहने चालवताना काळजी घ्यावी.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 
मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती. राजकीय सहभाग वाढेल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 20th January 2021