आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २० मार्च २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
शनिवार : फाल्गुन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.३९ सूर्यास्त ६.४४, चंद्रोदय सकाळी ११.०३, चंद्रास्त रात्री १२.३६, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ६.४४, भारतीय सौर फाल्गुन २९ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२२ : मराठी रंगभूमीवरच्या बदलत्या प्रवाहाबरोबर प्रवास करणारे यशस्वी नाटककार प्रा.वसंत कानेटकर यांचा जन्म. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, मनोविश्‍लेषणात्मक, फार्स, फॅन्टसी, चरित्रात्मक अशा विविध प्रकारच्या ३५ नाटकांचे लिखाण. ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘अखेरचा सवाल’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, अशी त्यांची अनेक नाटके गाजली. ‘घर’, ‘पंख’, ‘पोरका’ या तीन कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. 
१९२७ : महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्‍यांना पाणी भरता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंधरा हजार अनुयायांसह सत्याग्रह व मनुस्मृती जाळली.
१९५६ : आधुनिक मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी, लेखक व समीक्षक बाळ सीताराम मर्ढेकर यांचे निधन.
१९९२ : जागतिक कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना देशातील सर्वोच्च ‘भारतरत्न’ किताब जाहीर.
१९९७ : मराठी चित्रपट व नाट्य अभिनेत्री वसुंधरा पौडवाल यांचे निधन.

दिनमान -
मेष :
व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभाची शक्‍यता आहे. 
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
सिंह : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गुरूकृपा लाभेल.
तुळ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. वादविवाद टाळावा. राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. चांगल्या कामासाठी खर्च होईल.
मकर : नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जागेचे प्रश्‍न सुटतील.
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com