Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 मे 2021

पंचांग - गुरुवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६, सूर्यास्त ७.०१, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री २.०१, दुर्गाष्टमी, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४३.

पंचांग -

गुरुवार : वैशाख शुद्ध ८, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६, सूर्यास्त ७.०१, चंद्रोदय दुपारी १, चंद्रास्त रात्री २.०१, दुर्गाष्टमी, भारतीय सौर वैशाख ३० शके १९४३.

दिनविशेष -

१७६६ - मराठेशाहीतील पराक्रमी आणि मुत्सद्दी सेनापती मल्हारराव होळकर यांचे निधन.

१८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना यांसारखे समाजशिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांच्या वडिलांनी (कृष्णशास्त्री) चालविलेल्या ‘शाळापत्रक’ मासिकातून त्यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला. सरकारी नोकरीत असताना त्यांनी ‘निबंधमाला’ हे प्रसिद्ध मासिक काढले.

१९९२ - सामाजिक कार्यकर्त्या, मुंबईच्या माजी नगरपाल आणि भारतातील ऐच्छिक रक्तदान सेवेच्या प्रवर्तक लीला मुळगावकर यांचे निधन.

दिनमान -

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. नोकरी, व्यवसायात वाढ करू शकाल.

मिथुन : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधकांवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. शासकीय कामे पार पडतील.

धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारीतील मतभेद कमी करू शकाल.

मीन : मनोबल कमी राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com