आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

पंचांग -
गुरुवार : पौष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ, भारतीय सौर पौष ३० शके १९४२.

पंचांग -
गुरुवार : पौष शुद्ध ८, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, चंद्रोदय दुपारी १२.३६, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.२०, दुर्गाष्टमी, शाकंभरी देवी उत्सवारंभ, भारतीय सौर पौष ३० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८२ : मराठी कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत वामन मल्हार जोशी यांचा जन्म.
१८९४ : श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन यांचा जन्म.
१९१० : चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक शांताराम आठवले यांचा जन्म. संत तुकाराम चित्रपटातील ‘आधी बीज एकले...’ हे गीत त्यांनी लिहिले होते.
१९४५ : स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते रासबिहारी बोस यांचे निधन.
१९९७ : जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या देशी बनावटीच्या ‘पिनाक’ रॉकेटची बालासोर येथून जवळच असणाऱ्या चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.
२००३ : राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : अनपेक्षितपणे एखादी मोठा खर्च संभवतो. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. काहींचे बौद्धिक व मानसिक परिवर्तन होईल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. 
वृश्‍चिक : प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 
धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : नातेवाईकांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : आर्थिक सुयश लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 21st January 2021