
पंचांग -
रविवार - ज्येष्ठ कृ. ३०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१४, सूर्यग्रहण, भारतीय सौर ३१, शके १९४२.
पंचांग -
रविवार - ज्येष्ठ कृ. ३०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१४, सूर्यग्रहण, भारतीय सौर ३१, शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९२८ - प्रसिद्ध लेखक नाथमाधव यांचे निधन. त्यांचे पूर्ण नाव द्वारकानाथ माधव पितळे.
१९४० - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे निधन.
१९४८ - भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सूत्रे हाती घेतली. भारत प्रजासत्ताक होऊन राष्ट्रपतिपदाची निर्मिती होईपर्यंत गव्हर्नर जनरल हेच देशातील सर्वोच्च पद होते.
१९५३ - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा जन्म.
१९८४ - मराठी चित्रपट-नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे निधन.
१९९२ - विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाज-विज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक मध्य प्रदेश सरकारतर्फे जाहीर.
१९९४ - भारताने सोडलेल्या उपग्रहामार्फत येणारी माहिती गोळा करण्यासाठी अमेरिकेतील ओक्लहामा राज्यात नॉर्मन येथे उभारण्यात आलेल्या ‘इओसॅट’ केंद्राचे उद्घाटन.
१९९५ - पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ‘द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९८ - फ्रॅंकफर्ट बुद्धिबळ महोत्सवाचे निमित्त साधून आयोजित केलेल्या लढतीत भारतीय ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदने आपल्या देदीप्यमान बुद्धिबळ कारकिर्दीत मानाचा तुरा खोवताना ‘फ्रीट्झ ५’ या जगातील सर्वोत्तम व्यावसायिक संगणकाचा सहज पराभव केला.
२००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास सूर्यग्रहण, ‘डायमंड रिंग’च्या रूपात पाहण्याचा देशीविदेशी आकाशनिरीक्षकांनी आफ्रिकेतील झांबिया येथे जाऊन आनंद लुटला.
२००२ - भारताने बालासोर येथून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंडीपूर येथे ‘नाग’ या रणगाडाभेदी दोन क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली.
२००४ - ‘स्पेसशिप वन’ या पहिल्या खासगी अंतराळ यानाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. माईक मेलव्हिल या वैमानिकाने हा विक्रम केला. ‘व्हाईट नाईफ’ रॉकेटने या यानाला घेऊन उड्डाण केले.
दिनमान -
मेष : आपला जनसंपर्क वाढणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
वृषभ : आरोग्य चांगले राहील. व्यवसायामध्ये उलाढाल होईल. काहींची जुनी येणे वसूल होतील.
मिथुन : काही दिवसांपासून असणारी मानसिकता आता कमी होईल. जनसंपर्क वाढेल.
कर्क : आरोग्याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायाची कामे मार्गी लागतील.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी.
तूळ : काहींना सुसंधी लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
वृश्चिक : नको त्या गोष्टींसाठी वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.
धनू : जोडीदाराची साथ लाभेल. काहींना वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.
मकर : आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जनसंपर्क टाळावा. बाहेर पडू नये.
कुंभ : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. प्रॉपर्टीच्या कामांकडे लक्ष देऊ शकाल.
मीन : घरातील व्यक्तींबरोबर सुसंवाद साधू शकाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.