आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २१ मार्च २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
रविवार : फाल्गुन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.५०, चंद्रास्त रात्री १.२९, सूर्योदय ६.३८, सूर्यास्त ६.४४, भानुसप्तमी, भारतीय सौर फाल्गुन ३० शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१६ : सनईसारख्या मंगल वाद्याने वर्षानुवर्षे कित्येक भारतीयांचे अनेक क्षण मंगलमय करणारे, ‘शहनाई नवाझ’ म्हणून गाजलेले  सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण , भारतरत्न हे सन्मान प्राप्त झाले आहेत.
१९९५ : पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रातील कामगिरीबद्दल उद्योगपती नंदन गाडगीळ यांना ‘विजिटेक्‍स इंटरनॅशनल फाउंडेशन’च्या वतीने ‘मॅन ऑफ द ईयर’ पुरस्कार प्रदान.
१९९६ : ध्रुवीय उपग्रहवाहकाच्या मालिकेतील ‘पीएसएलव्ही-डी-३’ या भारतीय बनावटीच्या उपग्रहवाहकाचे श्रीहरिकोटा येथून उड्डाण. 
१९९७ : पुणे जिल्हा परिषदेच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत प्रथमच एका महिलेला - योगिता कोकरे यांना सर्वोच्च असे अध्यक्षपद मिळाले.
२००१ : भारतासह जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींवर तब्बल पाच दशके आपल्या सुरांच्या साह्याने अधिराज्य गाजविणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दिनमान -
मेष :
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.मनोबल उत्तम राहील.
मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कर्क : महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
सिंह : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.
कन्या : सार्वजनिक कामात उत्साह वाढेल. व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल.
तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनू : जोडीदाराचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता राहील.
कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे पार पडतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com