esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 21 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार - अधिक अश्‍विन शु.5, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय 10.09, चंद्रास्त रा. 9.54, भारतीय सौर 30, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 21 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - अधिक अश्‍विन शु.5, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तुला, सूर्योदय 6.26, सूर्यास्त 6.31, चंद्रोदय 10.09, चंद्रास्त रा. 9.54, भारतीय सौर 30, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
अल्झायमर्स दिन । आंतरराष्ट्रीय शांतता दिन 
१९९४ - नामवंत उद्योजक आणि अजय मेटाकेम लिमिटेड, युनायटेड मेटाकेम वगैरे कंपन्यांचे संचालक माधवराव गोविंदराव पवार यांचे निधन.
१९९४ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ख्यातनाम उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचे निधन. बच्छराज अँड कंपनी, हिंदुस्थान शुगर मिल्स, मॅचवेल इलेक्‍ट्रिकल्स (इंडिया), हर्क्‍युलस हॉइस्ट्‌स वगैरे कंपन्यांचे त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांनी ‘जपान की सैर’, ‘रुसी युवकों के बीच’, ‘अटलांटिक के उसपार’, ‘द यंग रशिया’ व ‘सोशल रोल ऑफ बिझिनेस’ ही पुस्तके लिहिली.
१९९४ - फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फ्रेंच विभागाच्या प्रमुख डॉ. नीलिमा रेड्डी यांना फ्रेंच भाषा शिकविण्याबाबत केलेल्या कार्याबद्दल फ्रान्सतर्फे ‘ख्रुआ द शॉव्हलिअर द लॉर्द दे पाम ॲकॅदेमिक’ हा पुरस्कार प्रदान.
१९९५ - पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक डॉ. पॉल रत्नासामी यांना इटली येथील ‘थर्ड वर्ल्ड नेटवर्क ऑफ सायंटिफिक ऑर्गनायझेशन’चा तंत्रज्ञानविषयक पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष -
आरोग्य चांगले राहील. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ - एखादी मानसिक चिंता राहील. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मिथुन - संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात लाभदायक स्थिती राहील. ताण वाढेल.
कर्क - प्रॉपर्टीसाठी, खरेदीसाठी चांगला दिवस असला तरी मोह टाळा. प्रसन्नता लाभेल. 
सिंह - मनोबल वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या - वैचारिक प्रगती होईल. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ - आरोग्य उत्तम राहील. धाडस करण्याकडे कल राहील. कामे पूर्णत्वास न्याल.
वृश्‍चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
धनु - उमेद वाढेल. वैचारिक परिवर्तनाची शक्यता आहे. इतरांवर अवलंबून राहू नका.
मकर - कर्तृत्त्वाला संधी मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. मान, प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने कराल. 
मीन - महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Edited By - Prashant Patil