esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - कार्तिक शुद्ध ८, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.४६ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी १.११, चंद्रास्त रात्री १२.५३, गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, गाईचे पूजन व प्रदक्षिणा, गाईच्या मागून चालणे, भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - कार्तिक शुद्ध ८, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.४६ सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी १.११, चंद्रास्त रात्री १२.५३, गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, गाईचे पूजन व प्रदक्षिणा, गाईच्या मागून चालणे, भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९१३ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ, नाणावलेले मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. १९७० - ७३ या काळात ते भारताचे अमेरिकेतील राजदूत व १९७३ ते १९८१ या दरम्यान ते जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल होते.
१९६३ - अमेरिकेचे पस्तिसावे अध्यक्ष जॉन केनेडी यांची हत्या. श्री. केनेडी यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या ‘प्रोफाइल्स इन करेज’ या पुस्तकास ‘पुलित्झर पुरस्कार’ मिळाला.
१९६३ - थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‌घाटन.
२००० - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अणुरसायनशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्राचे कुशल अध्यापक प्रा. डॉ. हरी जीवन ऊर्फ एच. जे. अर्णीकर यांचे निधन.
२००० - ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ हिंदी कवी व लेखक नरेश मेहता यांचे भोपाळ येथे निधन.
२००२ - भारताचे माजी कसोटीपटू सी. एस. नायडू यांचे निधन. ‘सी. एस.’ या अद्याक्षरांनी ते ओळखले जात. त्यांनी ११ कसोटींत भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रथमश्रेणी कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. 
२००४ - महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे चिटणीस व पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधू जोशी यांचे निधन. राज्य नाट्य स्पर्धा व कामगार कल्याण स्पर्धा यांसाठी काही नाटके व एकांकिका यांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. 

दिनमान -
मेष :
मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : काहींना कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे बेत आखाल.
धनु : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल.
मकर : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

Edited By - Prashant Patil