आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २४ मार्च २०२१

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
बुधवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी २.३२, चंद्रास्त पहाटे ४.०२, सूर्योदय ६.३६, सूर्यास्त ६.४५, भारतीय सौर चैत्र ३ शके १९४३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२४ - स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार श्रीमती लीलाताई मर्चंट यांचा जन्म. 
१९९६ -  काँग्रेस (आय) चे ज्येष्ठ नेते व ‘अमृतबझार पत्रिका’ आणि ‘युगांतर’ प्रकाशनांचे व्यवस्थापकीय संचालक तरुणकान्ती घोष यांचे निधन.
२००२ - पुण्याच्या वैद्यक क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आणि निष्णात डॉक्‍टर एस. जे. किणीकर यांचे निधन.

दिनमान -
मेष :
मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.
मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. जिद्दीने कार्यरत रहाल.
वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
मकर : उत्साह, उमेद वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत रहाल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.
मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. मनोबल उत्तम राहील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com