esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

dinman sakal main.jpg

पंचांग- शनिवारः निज आश्विन शुद्ध 8, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.04, चंद्रोदय दुपारी 1.49, चंद्रास्त्र रात्री 1.14, दुर्गाष्टमी, अष्टमी उपवास, नवमी उपवास, आयुध पूजन, सरस्वती विसर्जन, भारतीय सौर कार्तिक 2 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-


शनिवारः निज आश्विन शुद्ध 8, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.32, सूर्यास्त 6.04, चंद्रोदय दुपारी 1.49, चंद्रास्त्र रात्री 1.14, दुर्गाष्टमी, अष्टमी उपवास, नवमी उपवास, आयुध पूजन, सरस्वती विसर्जन, भारतीय सौर कार्तिक 2 शके 1942.


दिनमान


मेष - आजचा दिवस अनेक दृष्टीने शुभकारक आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ - तुमच्या कार्यक्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग येतील.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क - मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.

सिंह - नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या - शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तुळ - वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक - आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनु - कौटुंबिक अडचणी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर - मानसिक अस्वस्थता जाणवेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

कुंभ - धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा बाळगू नये.

मीन - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.