esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 ऑक्टोबर

पंचांग -
रविवार - निज आश्विन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी २.३२, चंद्रास्त रात्री २.०७, महानवमी, देवीला बलिदान, अश्वपूजन, विजयादशमी (दसरा), सीमोल्लंघन, नवरात्रोत्थापन, उपवास पारणा, अपराजिता व शमीपूजन, भारतीय सौर कार्तिक ३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 25 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - निज आश्विन शुद्ध ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.३२, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय दुपारी २.३२, चंद्रास्त रात्री २.०७, महानवमी, देवीला बलिदान, अश्वपूजन, विजयादशमी (दसरा), सीमोल्लंघन, नवरात्रोत्थापन, उपवास पारणा, अपराजिता व शमीपूजन, भारतीय सौर कार्तिक ३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९४ - ज्येष्ठ कीर्तनकार, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक व नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख विश्वस्त हभप बन्सीमहाराज तांबे यांचे निधन.
२००० - सॅंटिगो (चिली) येथील जागतिक कुमार मैदानी स्पर्धेत थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या सीमा अंतिल हिला भारतीय हौशी ॲथलेटिक्‍स महासंघातर्फे एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर.
२००३ - स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून माणसातील भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम घडवणारे आणि जगभर कोट्यवधी शिष्य लाभलेले पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन. भगवद्‌गीतेतील विचार सामान्यांपर्यंत पोचविणारा ज्ञानयोगी, सामूहिक शेती, स्वयंविकास अशा योजनांतून गावांचा विकास साधणारा कर्मयोगी आणि मागासलेल्या लोकांना व्यसनापासून दूर करणारे स्वाध्याय परिवाराचे प्रमुख, अशी पांडुरंगशास्त्रींची ओळख आहे. त्यांना पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार इ. मानसन्मान मिळाले आहेत.
२००३ - भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि जिगरबाज फलंदाज कर्नल हेमू अधिकारी यांचे निधन. अधिकारी यांनी शैलीदार फलंदाज म्हणून मोठा लौकिक मिळविला. २१ कसोटी सामन्यांत त्यांनी ३१.१४ च्या सरासरीने ८७२ धावा केल्या. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. 

दिनमान -
मेष :
नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींची अपेक्षित साथ लाभेल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
वृषभ : व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येवू शकतात. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन सुसंधी लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. काहींना सुवार्ता समजेल. प्रवासाचे योग.
सिंह : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : नोकरीत चांगली स्थिती राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे.
वृश्‍चिक : प्रॉपर्टीच्या संदर्भात नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : अपूर्व मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात सुयश. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : आर्थिक सुयश लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : दिवस सर्व दृष्टीने लाभदायक आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मीन : काहींना नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Edited By - Prashant Patil