esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

पंचांग

मंगळवार ः ज्येष्ठ शु.४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०० सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय रा. ०८.४७ चंद्रास्त सायं. १०.३४, भारतीय सौर ५,   शके १९४२.

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग

मंगळवार ः ज्येष्ठ शु.४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०० सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय रा. ०८.४७ चंद्रास्त सायं. १०.३४, भारतीय सौर ५,   शके १९४२.

दिनविशेष 

१८८५ - श्रेष्ठ मराठी नाटककार, कवी आणि विनोदकार राम गणेश गडकरी यांचा जन्म. त्यांनी ‘गोविंदाग्रज’ या नावाने कविता लेखन केले. तर ‘बाळकराम‘ या नावाने विनोदी लेखन केले. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके गाजली. ‘वाग्वैजयंती’ या नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१९२५ - ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, व्यंगकार, लघुकथाकार, नाटककार, समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचा जन्म. त्यांनी व्यंग अमरकोश नावाचा आगळावेगळा शब्दकोश तयार केला. 
२००० - भारतातील प्रसिद्ध व ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर शिरूर यांचे निधन.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२००० - मराठी भाषेतील आर्थिक विषयावरील पहिल्या नियतकालिकाचे संपादक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक श्री. वा. काळे यांचे निधन.

दिनमान

प्रा. रमणलाल शहा

मेष : मनोबल वाढेल. आर्थिक लाभ होतील. उत्साहाने कार्यरत राहाल.
वृषभ : निर्णय अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
मिथुन : आरोग्य सुधारेल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्याकडे लक्ष हवे. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
सिंह : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनात योजलेले पार पडेल.उत्साह, उमेद वाढेल. 
कन्या : मनोबल वाढेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.
तुळ : उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. निर्णय योग्य ठरतील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वृश्‍चिक : प्रगतीचा वेग मंद राहील. आरोग्य चांगले राहील. मनोबल वाढेल.
धनु : व्यवसायात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभ होतील. कलाकारांना संधी लाभेल.
कुंभ : जबाबदारी वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.
मीन  : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक धाडस टाळावे.