esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 मे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : वैशाख शुद्ध १५, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, चंद्रोदय सायंकाळी ७.०७, चंद्रास्त सकाळी ६.३३, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, वैशाख स्नान समाप्ती, बुद्धपौर्णिमा, पुष्टिपती विनायक जयंती, कुलधर्म, अन्वाधान, पौर्णिमा समाप्ती दुपारी ४.४४, खग्रास चंद्रग्रहण (भारतातून दिसणार नसल्याने वेधादि कोणतेही नियम पाळू नयेत.), भारतीय सौर ज्येष्ठ ५ शके १९४३.

दिनविशेष -

१८८५ - श्रेष्ठ मराठी नाटककार, कवी आणि विनोदकार राम गणेश गडकरी यांचा जन्म. त्यांनी ‘गोविंदाग्रज’ या नावाने कविता लेखन केले. तर ‘बाळकराम‘ या नावाने विनोदी लेखन केले. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके गाजली. ‘वाग्वैजयंती’ या नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत.

१९०६ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वनस्पती वैज्ञानिक व संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचा जन्म. तांबेरा रोगाला दाद न देणाऱ्या व अधिक उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.

१९२५ - ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, व्यंगकार, लघुकथाकार, नाटककार, समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचा जन्म. त्यांनी व्यंग अमरकोश नावाचा आगळावेगळा शब्दकोश तयार केला.

दिनमान -

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृषभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना नैराश्य जाणवले.

कर्क : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. आप्तजनांचा सहवास लाभेल.

तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. येणी वसूल होतील.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामे मार्गी लागतील.

धनु : शत्रुपिडा नाही. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : नवीन परिचय होतील. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्यता.