esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 एप्रिल 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : चैत्र शुद्ध १५/१, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय सायंकाळी ७.१७, चंद्रास्त सकाळी ६.४५, हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ, मन्वादि, पौर्णिमा समाप्ती सकाळी ९.०२, भारतीय सौर वैशाख ७ शके १९४३.

दिनविशेष -

१८५४ - पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

१८७८ - स्त्रियांना विद्यापीठाचे उच्चशिक्षण घेण्याला कलकत्ता विद्यापीठाने मंजुरी दिली.

१८९८ - नामवंत भारतीय गणिती व ज्योतिषशास्त्रज्ञ शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. पंचांगशोधन, नक्षत्रसंस्था व अंकगणित या भारतीयांनी जगाला दिलेल्या गोष्टी असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यांचा ‘भारतीय ज्योतिषशास्त्र’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१९६२ - जिल्हा लोकल बोर्डाचा ९६ वर्षांचा कारभार संपून जिल्हा परिषदा सुरू झाल्या.

१९८० - महाराष्ट्रातील सहकार अग्रणी पद्मश्री विठ्‌ठलराव विखे पाटील यांचे निधन.

१९९८ - भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.

१९९९ - एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताला प्राप्त.

दिनमान -

मेष : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

तूळ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : आध्यात्मिक प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सहकार्य लाभेल.

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

loading image