esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 ऑक्टोबर

पंचांग -
मंगळवार : निज आश्विन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी ३.४८, चंद्रास्त पहाटे ३.४७, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर कार्तिक ५ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 27 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार : निज आश्विन शुद्ध ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०३, चंद्रोदय दुपारी ३.४८, चंद्रास्त पहाटे ३.४७, पाशांकुशा एकादशी, भारतीय सौर कार्तिक ५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९० - चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही. शांताराम यांचे निधन. त्यांचे नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. ‘नेताजी पालकर’ हा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट.  त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आदींनी गौरविण्यात आले. त्यांचे ‘शांतारामा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
१९२० - भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म.  १९९२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपतिपदी निवड झाली. अनुसूचित जातीतील व्यक्तीची निवड होणारे ते प्रथम उपराष्ट्रपती होत.
२००१ - मराठी बालसाहित्याचे भीष्माचार्य भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. भागवत यांचे निधन. पुण्यात १९७५ मध्ये भरलेल्या पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या भागवतांनी मुलांसाठी पावणे दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. 
२००४ - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याच्या पृथ्वी-३ या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

दिनमान -
मेष -
जुन्या आठवणींना उजाळा देवू शकाल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ - सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन - प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क - कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. व्यवसायातील निर्णय पुढे घ्यावेत.
सिंह - तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या - कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शत्रुपिडा नाही.
तुळ - शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक - प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु - जिद्द व चिकाटी वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
मकर - शासकीय कामे मार्गी लावू शकाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढेल.
मीन - मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत. चिकाटी वाढेल.

Edited By - Prashant Patil