esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 ऑक्टोबर

पंचांग -
बुधवार - निज आश्विन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी ४.२३, चंद्रास्त पहाटे ४.३५, प्रदोष, क्षीरदान, द्विदलव्रत, भारतीय सौर कार्तिक ६ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - निज आश्विन शुद्ध १२, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी ४.२३, चंद्रास्त पहाटे ४.३५, प्रदोष, क्षीरदान, द्विदलव्रत, भारतीय सौर कार्तिक ६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९१ - पुणे येथील प्रसिद्ध समाजकार्यकर्त्या डॉ. मधुमालती गुणे यांचे निधन. हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजातल्या उपेक्षित वर्गाची सेवा केली. समाजकार्यासाठी त्यांना ‘दलितमित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
१९९४ - मध्य प्रदेश सरकारतर्फे ‘कुमार गंधर्व सन्माना’साठी प्रसिद्ध गायक राजन मिश्र व साजन मिश्र यांची निवड.
१९९७ - कर्नाटक संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ सरस्वती वीणावादक व्ही. दोरायस्वामी अय्यंगार यांचे निधन.
१९९७ - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात १९५९ ते १९६९ या कालावधीत ज्या ७० व्यक्ती मृत्यू पावल्या त्यांना हुतात्मा म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय.
१९९७ - केंब्रिजच्या ‘इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर’तर्फे मुंबई येथील रसायनशास्त्र विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक रविकांत गोयल यांना १९९६-९७ चा ‘इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर’ चा किताब जाहीर.
२००१ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते काकासाहेब थोरात यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामातही अडचणी जाणवतील.
वृषभ : विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.आरोग्य उत्तम राहील. 
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. अंदाज अचूक ठरतील.
कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनपेक्षितपणे एखादा खर्च वाढेल.
वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. संततिसौख्य लाभेल.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द वाढेल.
मकर : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. 
कुंभ : अनपेक्षित जुनी येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो.
मीन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Edited By - Prashant Patil