
पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ९.१४, चंद्रास्त सकाळी ९.४२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १२ शके १९४२.
पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष कृष्ण ३, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०८ सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय रात्री ९.१४, चंद्रास्त सकाळी ९.४२, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर पौष १२ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
१९४३ : हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.
१९४४ : समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन.
१९९८ : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. प्रदान.
१९९९ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.
२००० : संत ज्ञानेश्वरांच्या स्मरणार्थ त्यांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.
२००२ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटचे संस्थापक अनिल आगरवाल यांचे निधन. सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले होते.
दिनमान -
मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. हितशत्रूंवर मात कराल.
तुळ : प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्चिक : सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
धनु : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास शक्यतो पुढे ढकलावेत.
मकर : आरोग्य उत्तम राहील. काहींना नोकरीत बढतीची शक्यता आहे.
कुंभ : वेळ विनाकारण वाया जाण्याची शक्यता. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नवीन परिचय होतील.
Edited By - Prashant Patil