esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०२ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग
मंगळवार - ज्येष्ठ शु. ११  चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, निर्जला एकादशी चंद्रोदय दु. ०३.४० चंद्रास्त रा.०३.०७ भारतीय सौर १२,  शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०२ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - ज्येष्ठ शु. ११  चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, निर्जला एकादशी चंद्रोदय दु. ०३.४० चंद्रास्त रा.०३.०७ भारतीय सौर १२,  शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष -
१९२९ - प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांचा जन्म. ‘रात और दिन’, ‘बरसात’, ‘चोरी चोरी’, ‘श्री ४२०’, ‘मदर इंडिया’, ‘आवारा’, ‘छोटी भाभी’, ‘बाबूल’ आदी अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
१९४८ - शेतकरी कामगार पक्षाची स्थापना. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय प्रभावी होता.
१९८८ - प्रसिद्ध अभिनेते, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, वितरण या क्षेत्रांत त्यांनी स्वतःची शिखरे निर्माण केली. 
१९९२ - महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन.
१९९७ - ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील ‘यमुनाजळी खेळू....’ या गाण्यामुळे गाजलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांचे निधन. त्यांचे मूळ नाव रतन शिरोडकर असे होते. 
२००० - प्रख्यात लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना पंजाबी साहित्यातील मोलाच्या कामगिरीबद्दल दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा ‘सहस्रकातील कवयित्री’ हा पुरस्कार जाहीर.
२००१ - जम्मू-काश्‍मीरमधील हॅनले वेधशाळा व बंगळूर येथून ३५ किलोमीटर अंतरावरील होस्कोट संशोधन केंद्रातील उपग्रह संपर्क यंत्रणेचे उद्‌घाटन.

दिनमान -
मेष : उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील.आर्थिक लाभ होतील.
वृषभ : कर्तृत्त्वाला संधी मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : मनोबल वाढेल. व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. शत्रुपिडा नाही.
कर्क : मनोबल वाढेल. सौख्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
सिंह  : मनोबल वाढेल. अपेक्षित फोन होतील.आर्थिक लाभ होतील.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नव्या ओळखी होतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगली संधी मिळेल. आरोग्याकडे लक्ष हवे.
वृश्‍चिक  : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक सौख्य लाभेल.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रतिष्ठा लाभेल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कुंभ  : एखादी भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात प्रगती होईल.
मीन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय आज घेवू नये.