आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 3 जानेवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १०.१२, चंद्रास्त सकाळी १०.२७, भारतीय सौर पौष १३ शके १९४२.

पंचांग -
रविवार : मार्गशीर्ष कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय रात्री १०.१२, चंद्रास्त सकाळी १०.२७, भारतीय सौर पौष १३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८३१ : थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. 
१९३१ : महाराष्ट्रातील प्रसद्ध विचारवंत य. दि. फडके यांचा जन्म.
१९५० : पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पं. नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
१९९४ : मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक, अमरेंद्र लक्ष्मण गाडगीळ यांचे निधन. 
१९९८ : तत्त्वज्ञानाचे अभ्यासक  प्रा. केशव विष्णू बेलसरे यांचे निधन. 
२००१ :  गांधीवादी कार्यकर्त्या डॉ. सुशीला नायर यांचे निधन. 
२००२ : ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सतीश धवन यांचे निधन.
२००४ : ‘नासा’ने मंगळावर पाठविलेले ‘स्पिरीट’ हे यान या ग्रहावर यशस्वीपणे उतरले.

दिनमान -
मेष :
तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव राहील. आत्मविश्‍वास वाढेल.
वृषभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.
कर्क : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधक व हितशत्रुंवर मात कराल.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ : सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारीतील मतभेद कमी होतील.
मीन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 3rd January 2021