esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०४ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - ज्येष्ठ शु. १३/१४  चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय दु. ०५.४४ चंद्रास्त प.०४.३६ भारतीय सौर १४, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०४ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - ज्येष्ठ शु. १३/१४  चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय दु. ०५.४४ चंद्रास्त प.०४.३६ भारतीय सौर १४, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष -

  • International day of Innocent Children Victims of Aggression
  • १९१० - पाण्यावरून तसेच जमिनीवरून तरंगत चालणाऱ्या हॉवरक्राफ्ट या वाहनाचे प्रणेते सर ख्रिस्तोफर कॉकरेल यांचा जन्म.
  • १९१४ - जगप्रसिद्ध कायदेपंडित सर विल्यम रेनेल ॲन्सन यांचे निधन.
  • १९३२ - रामकृष्ण परमहंस यांचे एक परमभक्त आणि ‘श्रीरामकृष्ण कथामृत’ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक महेंद्रनाथ गुप्त यांचे निधन. भारतातील बहुतेक सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांत या ग्रंथाचे भाषांतर झाले आहे.
  • १९४७ - बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक व प्रकांड पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. 
  • १९९३ - ‘आयएनएस म्हैसूर’ या विनाशिकेचे जलावतरण.
  • १९९४ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना चित्रपट क्षेत्राच्या विकासात ५० वर्षे मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
  • १९९७ - दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणाऱ्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘इन्सॅट -२ डी’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोअरू अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण.
  • १९९८ - ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व विश्वभारती  विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अशिन दासगुप्ता यांचे निधन.

दिनमान -
मेष : महत्त्वाची कामे दुपारी १ पर्यंत करावीत. आर्थिक लाभ होतील.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारी १ नंतर करावीत. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. कोणाकडूनही अपेक्षा करू नका.
कर्क : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.
सिंह  : नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात वाढ होईल.
कन्या : प्रगती वेगाने होईल. विरोधकावर मात कराल.शासकीय कामात यश लाभेल.
तुळ : सुयश लाभेल. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल.शासकीय कामात यश लाभेल.
वृश्‍चिक  : मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.
धनु : भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाची कामे दुपारी १ पूर्वी करावीत. मनोबल वाढेल.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सार्वजनिक कामात यश लाभेल.
कुंभ  : व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. तुमचा प्रभाव पडणार आहे.
मीन : महत्त्वाची कामे दुपारी १ नंतर करावीत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.