esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 6 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - श्रावण कृ. ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रा.९.११, चंद्रास्त स.८.२५, भारतीय सौर १५, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 6 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - श्रावण कृ. ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.१५, सूर्यास्त ७.०७, चंद्रोदय रा.९.११, चंद्रास्त स.८.२५, भारतीय सौर १५, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
हिरोशिमा दिन
१८८१ - पेनिसिलिन या औषधाचे संशोधक असलेले नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सर अलेक्‍झांडर फ्लेमिंग यांचा जन्म.
१९२५ - प्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. ४५ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, चार नाटके, एक चरित्रात्मक कादंबरी, बारा कुमार वाङ्‌मयाची पुस्तके इत्यादी साहित्यसंपदा त्यांच्या गाठी आहे.
१९२५ - काँग्रेसचे एक संस्थापक आणि जहाल गटाचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन.
१९४५ - अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला.  वीस हजार टन टीएनटीच्या (ट्रायनायट्रोटोल्यूइन) स्फोटामुळे जेवढी ऊर्जा निर्माण झाली असती, तेवढी ऊर्जा या स्फोटामुळे सुमारे एक मायक्रोसेकंद (१० सेकंद) इतक्‍या कालावधीत निर्माण झाली व हिरोशिमा शहराचा दहा चौरस किलोमीटर भाग उद्‌ध्वस्त झाला.
१९६५ - विख्यात संगीत दिग्दर्शक वसंत पवार यांचे निधन. एकाच चित्रपटगृहात अडीच वर्षे चाललेल्या ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते.
१९९४ - डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान.
१९९९ - माजी केंद्रीय मंत्री कल्पनाथ राय यांचे निधन.

दिनमान -
मेष :
अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. आर्थिक संदर्भात तुमचे अंदाज योग्य ठरतील.
वृषभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मिथुन : नवीन करारमदार करण्यास दिवस चांगला आहे. कामाचा ताण जाणवेल.
कर्क  : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. अयोग्य कामासाठी खर्च होतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.प्रवास शक्यतो टाळावेत.
कन्या : व्यवसायाच्या संदर्भात यश लाभेल. कोणाच्याही सहकार्यावर अवलंबून राहू नका.
तूळ : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. कामे मार्गी लागतील.
वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. स्वास्थ्य लाभेल.
धनू : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
मकर : अपेक्षित कामे मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात यश लाभेल.
कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
मीन : मुलामुलींसंदर्भात समस्या निर्माण होईल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

Edited By - Prashant Patil