esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांगः  सोमवार - निज आश्विन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.२६, चंद्रास्त दुपारी १.४५, भारतीय सौर कार्तिक १८ शके १९४२

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 9 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांगः 


सोमवार : निज आश्विन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.२६, चंद्रास्त दुपारी १.४५, भारतीय सौर कार्तिक १८ शके १९४२

दिनविशेष - 


1904: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. त्यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान (वनस्पतींच्या बाह्य स्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र) व गर्भविज्ञान यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले.
1911: मराठी साहित्यिक आणि व्यासंगी समीक्षक डॉ. रामचंद्र शंकर वाळिंबे यांचा जन्म. काव्य, नाट्य, संगीत, तत्त्वज्ञान, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास, साहित्यसमीक्षा, सौंदर्यशास्त्र अशा कितीतरी क्षेत्रांत डॉ. वाळिंबे यांनी मुक्त संचार केला. "साहित्याचा ध्रुवतारा' हे त्यांचे पहिले पुस्तक. शाकुंतल, वेणीसंहार, मुद्राराक्षस, स्वप्नवासवदत्त या विख्यात नाटकांचा मराठी अनुवाद वाळिंबे यांनी केला.
1962: स्त्रीशिक्षणाचे महान प्रसारक, महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन. त्यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान मिळाला होता.
1967: मराठी चित्रपट व रंगभूमीवरील नामवंत अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे निधन.
1977: मराठी रंगभूमीवरील भावगीतांना सुरेल साज चढविणारे संगीतकार केशवराव भोळे यांचे निधन. "डोळे हे जुल्मी गडे' , "आधी बीज एकले', "वृक्षवल्ली आम्हा सोयरी', "आम्ही जातो अमुच्या गावा', "पाहू रे किती वाट', "एक तत्त्व नाम', "दोन घडीचा डाव' इ. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. संगीत, नाट्य, साहित्य, समीक्षा अशा क्षेत्रांत चौफेर कामगिरी त्यांनी केली. "जे आठवते ते' हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.
1995: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) रसायन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. के. रांजेकर व रसायन अभियांत्रिकी विभागाचे डॉ. व्ही. आर. चौधरी यांना अहमदाबादच्या नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्यत्व देऊन गौरविले.
1997: ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान.
2000: जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोचे एक चित्र न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात 5 कोटी 56 लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्राच्या किमतीबाबतचा हा विक्रम होय.
2000: भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत झालेली शिक्षा उच्च न्यायालयाने कमी करू नये, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. शिक्षा कमी केल्याने भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
2003: ध्वनीच्या वेगाने प्रवास करणाऱ्या "ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. हे 290 किलोमीटर पल्ल्यापर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र दोनशे किलोपर्यंत वजनाची पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते.

आजचे दिनमान


मेष - शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
वृषभ - कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मिथुन - नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटीच्या जोरावर हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल.
कर्क - प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
सिंह - आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल.
कन्या - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
तुळ - मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक - महत्त्वाची कामेशक्‍यतो पुढे ढकलावीत. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.
धनु - काहींना गुरूकृपा लाभेल. नवनवीन संधी मिळतील.
मकर - खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कुंभ - जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
मीन - शासकीय कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.