आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2021

sakal rashibhavishya
sakal rashibhavishya

दिनांक : 29 मार्च 2021 : वार : सोमवार
1857 - बंगाल पलटणीतील शिपाई मंगल पांडे याने बराकपूरच्या छावणीत ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा प्रसंग म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
1962 - पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍सच्या पेनिसिलीन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन.
1995 - ज्येष्ठ गुजराती साहित्यिक, "जन्मभूमी' व "प्रवासी' या गुजराती दैनिकांचे व "जन्मभूमी प्रवासी' या साप्ताहिकाचे मुख्य संपादक हरिन्द्र दवे यांचे निधन.
1995- रोम येथे युरोपातील सर्वात मोठ्या मशिदीचे बांधकाम पूर्ण. गेली 22 वर्षे बांधकाम चालू होते. तिच्या मिनारांची उंची 40 मीटर व घुमटाची उंची 22 मीटर आहे. एकाच वेळी 2000 जण नमाज पढू शकतील इतके या मशिदीचे मुख्य दालन आहे.
2003 - हिंदीचे प्राध्यापक व संगीत समीक्षक डॉ. श्रीरंग संगोराम यांना बिगर हिंदी क्षेत्रातील लेखकांच्या अनुवाद कार्याला देण्यात येणारा केंद्रीय हिंदी संचालनालयाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
2004 - भारताचा सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात 309 धावांची धडाकेबाज खेळी करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या 72 वर्षांच्या इतिहासात त्रिशतक नोंदविणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळविला.
2004 - "ऑस्कर' विजेते ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते पीटर उस्तिनॉव यांचे निधन.

आजचे राशिभविष्य -
मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
तुळ : हितशत्रुंचा त्रास कमी होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील.
मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कुंभ : वादविवाद शक्‍यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मीन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com